Loading...
सदर विवाहाची नोंद नोंदणी कार्यालयात करणे आवश्यक आहे .

A Perfect Venue
for Your Perfect Day

Celebrating Togetherness & Traditions With Your Trusted Venue for Every Occasion

About Us

Welcome to Sangam Mangal Karyalay

या वर्षी च्या लग्न मुहुर्तावर करा तुमच्या सुखी संसाराची सुरुवात.. संगम मंगल कार्यालय मार्फत घेऊन येत आहोत आपल्या सेवेत कमी खर्चात जास्त सेवा , 50 ते 1000 माणसांण पर्यंत समारंभांकरिता एक परिपूर्ण हॉल..!!

आमची खास वैशिष्ट्य:=

  • अनुभवी आणि शास्त्रोक्त विधी पार पाडणारे ब्राह्मण
  • आकर्षक आणि पारंपरिक सजावट
  • विवाहासाठी आवश्यक सर्व साहित्य (हार, मंगळसूत्र, जोडवे इ.)
  • दर्जेदार आणि स्वादिष्ट केटरिंग सेवा
  • एक्झिक्युटिव्ह व सुसज्ज मंगल हॉल
  • व्यावसायिक फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी सेवा
  • तत्पर व नम्र वेटर सेवा
  • पारंपरिक तसेच आधुनिक पद्धतीचे विवाह विधी आयोजन

15

Years of

Experience

1000

+

Marriages
Read More
Marriage Ceremony

आमच्याकडे वैवाहिक विधीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध आहेत — विवाह साहित्य, विधी साहित्य, अनुभवी ब्राह्मण सेवा, वधू–वरांसाठी आकर्षक हार तसेच उत्कृष्ट आणि स्वादिष्ट जेवणाची उत्तम सोय. तुमच्या जीवनातील हा खास दिवस आम्ही अधिक संस्मरणीय बनवतो!

Marriage Registration

हिंदू विवाह कायद्यानुसार दोन्ही व्यक्तींच्या सहमतीने विवाह सोहळा पार पाडला जातो. यासाठी लागणारे सर्व साहित्य — वधू–वरांचे हार, जोडवे, मंगळसूत्र, विधीसाठी आवश्यक सामग्री, अनुभवी ब्राह्मण आणि स्वादिष्ट जेवणाची सोय — हे सर्व एका छताखाली उपलब्ध आहे. सरळ, सुलभ आणि कायदेशीर पद्धतीने तुमचा विवाह सोहळा साकार करा.

Traditional Vidhi

आमच्याकडे सर्व पारंपरिक धार्मिक विधी प्रेमाने आणि शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले जातात — श्री गणपती पूजन, वरुण पूजन, कलश पूजन, पुण्यवाचन, सुपारी फोडणे, टिळा, हळदी समारंभ, मंगलाष्टका, मंगळसूत्र बंधन, कन्यादान, लज्जा होम, सप्तपदी इत्यादी. तुमचा प्रत्येक विधी भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा करा!

Documents Required for Registration

नोंदणीकृत विवाहासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्व झेरॉक्स प्रती प्रमाणित (attested) असणे बंधनकारक आहे.

आवश्यक कागदपत्रे
  • वर व वधू यांच्या रेशन कार्डाची किंवा आधार कार्डाची झेरॉक्स प्रत
  • वधू–वराचा वयाचा पुरावा (उदा. जन्म प्रमाणपत्र / शाळेचा दाखला / पॅन कार्ड)
  • तीन साक्षीदारांची ओळखपत्रे व निवासाचा पुरावा
  • वर, वधू आणि साक्षीदार यांचे पासपोर्ट साईज फोटो
  • सर्व झेरॉक्स प्रती प्रमाणित केलेल्या असाव्यात
साक्षीदारांसाठी मान्य ओळखपत्रांपैकी एक आवश्यक
  • रेशन कार्ड
  • बँक पासबुक / अकाऊंट बुक
  • ड्रायव्हिंग लायसन्स
  • मतदान ओळखपत्र (Election Card)
  • वीज बिल (Light Bill)
  • फोन बिल
  • पॅन कार्ड
Rules for Marriage Registration

Terms & Condition

वयाची अट
  • विवाहाच्या वेळी वराचे वय किमान २१ वर्षे आणि वधूचे वय किमान १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे.

पूर्ववैवाहिक स्थिती
  • जर वर किंवा वधू यांचा हा प्रथम विवाह नसेल, तर खालीलपैकी योग्य कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे
    1. वर–वधू घटस्फोटीत असल्यास — घटस्फोटाची अधिकृत कागदपत्रे.
    2. वर–वधू विधूर / विधवा असल्यास — पहिल्या पत्नीचा / पतीचा मृत्यू प्रमाणपत्र.
Important

Registration Information

नोंदणी करण्याचे ठिकाण
  • विवाह नोंदणी वर किंवा वधू ज्या गावात राहतात त्या गावाच्या तालुक्यातील उप–नोंदणी (Sub-Registrar) कार्यालयात करणे आवश्यक आहे.
  • सरकारी नियमानुसार, रजिस्ट्रेशन फॉर्मवर ₹100 कोर्ट फी स्टॅम्प लावणे आवश्यक आहे आणि विवाह झाल्यानंतर ३ महिन्यांच्या आत नोंदणी पूर्ण करणे बंधनकारक आहे.
  • नोंदणी करताना वर, वधू आणि तीन साक्षीदारांसह सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन जाणे आवश्यक आहे.

⏰ टीप: नोंदणी ३ महिन्यांच्या आत न केल्यास सरकारी नियमाप्रमाणे दंड आकारला जाईल.

Love Marriage Information

पालक उपस्थित राहू शकत नसलेल्या प्रेमविवाहाच्या जोडप्यांनी ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर विवाह संमतीपत्र तयार करावे, ज्यामध्ये खालील गोष्टी स्पष्टपणे नमूद असाव्यात:

  • दोघेही स्वखुशीने विवाहास तयार आहेत.
  • घरातून कोणत्याही मौल्यवान वस्तू किंवा हुंडा आणलेला नाही.
  • अशा प्रकारचे विवाहपूर्व संमतीपत्र तयार करून देणाऱ्या भारत सरकार अधिकृत नोटरी (Advocate) यांची माहिती आमच्या मंगल कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे.

Intercast Marriage Information
  • जर वधू–वर एका जातीचे असतील, तर तो सजातीय विवाह मानला जातो.
  • जर वधू–वर वेगवेगळ्या जातींचे असतील, तर तो आंतरजातीय विवाह समजला जातो.

१ फेब्रुवारी २०१० पासून, महाराष्ट्र सरकार आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना अनुदान योजना देते. त्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत:

  • मामलेदार / तहसीलदार कार्यालयाकडून मिळालेलं जात प्रमाणपत्र
  • अधिकृत विवाह प्रमाणपत्र
Marriage Hall
Reservation

Book Online